Blogs

Jaundice

कावीळ — समज व गैरसमज

ब-याच वेळेस डॉक्टर विचारतात की , पूर्वी केव्हा कावीळ झाली होती का? तेव्हा रूग्णाकडून हमखास येणारे उत्तर म्हणजे हो , पण त्यात खोलवर गेले तर असे लक्षात येते कि ती कावीळ नसते.
मळमळ होणे, उलटी होणे , डोळे पिवळे होणे , लघवी पिवळी होणे , पोट दुखणे , पांढरी कावीळ व यकृताला सुज येणे अशा व अनेक प्रकारच्या कावीळीच्या व्याख्या प्रचलीत आहेत.
इंग्रजीमधे कावीळीला बिलीरूबीन म्हणतात. यकृताच्या आजारामध्ये वर नमूद केलेली लक्षणे दिसू शकतात. त्यात डोळे व लघवी पिवळी होणे हे विशिष्ट लक्षण आहे.लाल रक्तपेशीचे जेव्हा नाश होते तेव्हा त्यातील घटकाचे यकृतामधे प्रक्रिया केली जाते , त्यातून बिलीरूबीन तयार होऊन पित्तनलिकेमधून छोटया आतडयामध्ये येते. बिलीरूबीनचे संडासमधून व काही प्रमाणात किडनीमधुन शरीराच्या बाहेर विसर्ग केला जातो. याचाच अर्थ असा की कावीळ लाल रक्तपेशींच्या; यकृताच्या किंवा पित्तनलिकेच्या आजारमध्ये दिसु शकते.
डोळे पिवळे होण्याची बरीच कारणे आहेत. त्यातील महत्वाची खालीलप्रमाणे आहेत.

अ. यकृताचे आजार – – डोळे व लघवी पिवळी होतात.
1. विषाणूमूळे होणारे —
– हेपॅटायटीस ए, इ. ( दूषीत पाण्यामूळे व अन्नामूळे पसरतात)
– हेपॅटायटीस बी ,सी , डी(रक्तसंसर्गामूळे पसरतात )
2. ऑटोइम्युन ( स्वत:ची रोगप्रतीकारक शक्ती यकृताला इजा करते)
3. फॅटी लिव्हर ( यकृतामधे चरबीचे प्रमाण वाढते )
4. पित्तनलीकेच्या अडथळयामूळे होणारी कावीळ
ब. रक्ताशी निगडीत आजार- डोळे पिवळे होतात पण लघवी
पिवळी होत नाही.
हिमोलायटीक अनेमीया – रक्तपेशी (लाल) कमी होणे.
क. गिलबर्ट सिंड्रोम
हिपॅटायटीस ए./इ. याची लागण दूषीत पाणी किंवा अन्नामूळेहोते. बहूतांश वेळा हे आजार काहीही उपचार न घेता दोन ते चार आठवडयात बरी होतात. रूग्नांना ब-याच वेळेस असे वाटते की काही आयुर्वेदीक किंवा गावठी वा तत्सम औषधे घेतल्यामूळे कावीळ बरी झाली.अशा तत्सम औषधीबद्दल काहीही पुरावा नाही. या आजारामध्ये काही रूग्नांना यकृत फेल्युअर होऊ शकतेा. तत्सम औषधी घेण्यात वेळ खर्ची केल्यामूळे असे रूग्ण आमच्याकडे उशीराने पोहोचतात व त्यावेळेस आपल्या हातात जास्ती काही नसते.
पांढरी कावीळ म्हणजे यकृताचा आजार असतो पण डोळे पिवळे झालेले नसतात. पांढरी कावीळ म्हणजे हेपॅटायटीस बी, सी,डी. काही वर्षापूर्वी हया आजारासाठी औषधे अस्तीत्वात नव्हती . विज्ञानाच्या प्रगतीमूळे आता हया आजावर नियंञण आणणे शक्य झाले आहे.हेपॅटायटीस सी.च्या नवीन उपचा-यामूळे त्याचे पूर्णपणे उच्याटन होऊ शकते. हे आजार दुषीत रक्त संसर्ग व शारीरीक संबंधामूळे पसरतात .हया आजाराचा योग्यवेळी उपचार केला तर यकृताचा सिरहोसीस (Cirrhosis) होण्यापासून बचाव होऊ शकतो.
सध्याच्या फास्ट फूडमुळे व शारीरीक कष्ट कमी झाल्यामूळे लठ्ठपणा वाढतो आहे. लठ्ठपणा आला की त्याच्या सोबत साखरेचा आजार( डायबीटीज) , उच्चरक्तदाब , मेटाबोलीक सिंड्रोम आलेच. यकृतामूळे चरबीचे प्रमाण अती झाल्यामूळे होणा-या आजाराला NAFLD असे म्हणतात . आम्ही लठ्ठपणामुळे मुलामधे होणा-या यकृताच्या आजारावर आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशीत केला आहे.त्यात 62% विद्यार्थांच्या यकृतामध्ये चरबीचे प्रमाण गरजेपेक्षा अधीक आढळून आहे.23% विद्यार्थांच्या यकृतावर त्याचा गंभीर परीणामसुध्दा दिसत होता.
अनेक सदृढ लोकांचेही अधूनमधून डोळे पिवळे होत असतात किंवा रिपोर्टमधे बिलीरूबिन वगळता बाकी सर्व चाचण्या ठीक असतात.त्यांना दुसरे काहीही लक्षण नसते. अशा व्यक्तींना गिलबर्ट सिंड्रोम असु शकतो.हा काही आजार नसुन बिलीरूबीनला यकृताबाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेमधला संथपणा आहे.काही विशिष्ट चाचण्या करून त्याचे निदान आम्ही करतो.हया व्यक्तींना घाबरण्याचे मुळीच कारण नाही.
बिलीरूबीन जेव्हा यकृतामध्ये तयार होते तेव्हा पित्तनलिकेद्वारे छोटया आतडयांमध्ये येते. जेव्हा हया नळीमध्ये अडथळा होतो तेव्हाही डोळे व लघवी पिवळे होतात. संडासला पांढरटपणा येतो व अंगाला खाज येते. अशा प्रकारचा अडथळा स्टोनमूळे , पित्ताशय , पित्तनलिका किंवा स्वादूपिंडाच्या गाठीमूळे होऊ शकतो. हया प्रकरच्या कावीळीसाठी तांडातून विशीष्ट प्रकारची दूर्बीन टाकून पित्तनलिकेमध्ये स्टेंट टाकला जातो.(ERCP)
थोडक्यात सांगायचे म्हणजे कावीळ हा आजार नसून लक्षण आहे.कावीळीची अनेक कारणे असतात त्याचे योग्यवेळी निदान व त्यानूसार उपचार केले पाहीजे

Share this post